Powered By Blogger

Monday, January 12, 2015

मराठी सुफी (प्रयत्न क्रमांक : दोन)

क्षण..!
मराठी सुफी (प्रयत्न क्रमांक : दोन)
कधी पाहिलेयेस का तू उन्हातल्या सावलीला, शांत असते जितकी तितकाच गारवा उधानलेला, मनात उठते वेदनेची कळ, हृदयही माझे शरीरातून काढते पळ, कुठे आहे तुझे अस्तित्व शोधत राहातो मी सतत, आठवांशीही तुझ्या माझे तुझ्याशिवाय नाही पटत, आसवं ओघळतो माझा नयनातून, ओंजळ तुझी एकवटतो शब्दांतून, भाव नसतो माझा, सहवास घडतो तुझा, समजवू कुणाला मी सांग माझी व्यथा, काय झाली गं बघ माझी अवस्था..!
क्षणात सुर तुझाच मी छेडतो
गीत मुखाने तुझेच मी गातो
जडलंय हृदय तुझ्यावरी असे
प्रित उखाणे तुझेच मी घेतो
संवाद कसला करू तुझ्याशी
वाद झालाय माझाच माझ्याशी
उजेड दाखवू नकोस मला गं
अंधार पडलाय आजच दाराशी
वळना-वळनावरची गं वाट तू
स्वप्नांचा आता इथे काय हेतू
भोवला मला ही माझाच श्वास
निराधार उभारु कसा मी से'तू
उरात पेटली आग, सांभाळ तुझी बाग, वेदना त्याचीच ही अशी करते जिवापाड प्रेम, वाटते तिला फक्त तिरस्कारच त्याचा कायम, अवहेलना तो करतो स्वत:ची, विटंबना होते तिच्यावर लिहिलेल्या कवितेची, विचारते ती हे असलं कसलं रे तुझं प्रेम माझ्यावर, जखम मला होते अन् जिव येतो तुझा हातावर..!
हसतो कधी मी एकाकी
आठवून तुझ्या आठवणी
मोकळे केस तुझे सोडून
चंद्र बघतो माझा डोळ्यांनी
लज्जेचा पदर तू ओढते
कंपणं माझी उगा वाढवते
भरुन घेतो जितके डोळ्यात
सगळे आसवातच वाहून जाते
ओंजळीत तुझ्या मग काही
मला माझे द्यायचे राहून जाते
आयुष्याच्या पटलावर तुझे
अस्तित्व लिहायचे राहून जाते
मोकळी हसते ती त्याच्या वेदनेला, वेडाच आहे म्हणते माझा रे दिवाना, पुर्ण इथे काहीच होत नाही, बाधित मोगरा पुन्हा प्रित करत नाही, रातराणी बनून ती एकाकी कुठे तरी फुलते, तो वेडा प्राजक्त तिच्याच दारात हसत उभा जळतो, धावत ती येत नाही, डोळ्यातला आसवांचा पाऊस थांबवू शकत नाही, एकमेकांसाठी पंख घेवून जन्मलेले ते पाखरं, स्वत:साठीही आभाळात उडू शकत नाही..!
आयुष्य वेगातच पुढे जाते
आठवण मागे तशीच राहाते
एक क्षण मिळाला तर पुन्हा
जगण्याची उर्मी मिळू लागते
स्वप्ने सजतात पुन्हा आशेने
खचतात मन सतत निराशेने
काय लिहिलेयेस रे तू कर्माने
परकी आपलीच झाली स्पंदने
अधुरा चंद्र अन् अधुरी कहानी
कोरी पाने तशीच वैरी लेखणी
मदमस्त सांज रंग उधळते अन्
सगळेच राहून जाते मनो-मनी
हृदय त्याचे रडते, आसवांचे अस्तित्व कागदावर उमटते, शब्द-शब्द त्याचे वाचून तिचे मन तळमळते, त्याच्या शब्दांवरच मग ती मीरे सारखे प्रेम करते, तो लेखणीतून मुरली स्वर लिहितो, कागदावर तिच्या स्पंदनांचा ताल भेटतो, आयुष्य त्याचे तिचे येव्हढेच मग, जगापुढे येवूनही त्या दोघांचे वेगळेच जग, कारभार तोच, कामकाज तेच, सरतही नाही, उरतही नाही, प्रेमाचा पावसाळा वेळे आधी सुरु होत नाही..!
.
_________ समाप्त_________
.
© मृदुंग

No comments:

Post a Comment