Powered By Blogger

Tuesday, January 5, 2016

कर्जबाजारी..! :-)


♥ क्षण..! ♥

कर्जबाजारी..!

आजकाल दोन-दोन, चार-चार दिवस आमचं बोलणं होत नाही... दोघंही एकमेकांना ऑनलाईन बघत राहतो... ती बोलेल, मी उगाच कशाला ना डिस्टर्ब... तसही आपण पिंग केलं का पुढे क पासून सुरु होणाऱ्या सगळ्या प्रश्नांना विचारावं लागेल... आणि काय औपचारिक उत्तरे मिळतील त्यापेक्षा नकोच काही! आठवण येते? छे! छे! आठवणीचं काय आलं यात? इथे दररोज काही असत नाही तिथे आठवण कशी आणि का म्हणून असणार? ठराविक औपचारिकता आटोपल्यावर ओळख तिथेच संपते... नातं जुळायला आणि जपायला औपचारिकतेची गरज अवचित जरी पडत असली तरीही ते नातं आहे... शाश्वत आणि शुद्ध तेवढच विश्वसनीय मग औपचारिकतेची आवश्यकता काय असते..? एक सुरुवात करायला! मग ती नात्यांची असो अथवा जगण्याची... सुरुवात ही प्राथमिकच करावी लागते... अंतर कमी करायला अंतर वाढवून राहणे मला कितीही पसंत असले तरी एक अंतर गळून पडायला अवधी आणि वेळ आपण देण्यापेक्षा हवा असेल तेवढा वेळ घेऊ देणे आणि बसं स्वप्नच आहे म्हणत स्वतःला दिलासा देणे हे निश्चित आपण करु शकतो... नात्यांच्या गुंतवणूकीत मोबदला मागायचा नसतो... नात्यांच्या ठेवींवरचे व्याजावर व्याज परतावा म्हणून द्यायचा असतो... कारण इथे तिच्यामुळे मी आणि माझ्यामुळे ती अजून तरी कर्जबाजारी नाही..!
------------------------ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment