Powered By Blogger

Tuesday, January 26, 2016

चोचीनेच तारलं होतं..! :-)


♥ क्षण..! ♥

चोचीनेच तारलं होतं..!

फांदीवर कुठल्या घरटं एक होतं
फासे पारध्याच जाळं तिथेच होतं,

नजरेत भरारी न पंखात बळ होतं
चौघांचेच कुटुंब ते किलबिल होतं,

दिवस दाणे वेचून सांजेत मन भुलतं
घरट्याचं आंगण प्राजक्तानेच सजतं

तुळशीचं वृंदावनही सदा हसत होतं
घरट्यात ते कुटुंब सुखाने नांदत होतं,

एकदा पारध्याचे नशिब फळफळलं
कोवळं पंख जाळ्यात सापडलं होतं,

घरटं उदास झालं हताश होऊन गेलं
मुक आक्रोशात नभही निनादलं होतं,

सावज झाला असा कोवळाचं जीव
मनात कुणाच्याही चुकचुकलं नव्हतं,

आभाळचं होता पिंजरा कळलं असतं
घरट्याचं जाळं कुणीच विनलंही नसतं,

वेंधळी पाखरं दुखासह दूर उडून गेली
सुखाची किंमत देत जीव उधारचं होतं,

उदार पाखरांची ही तर महिमा झाली
पारध्याला स्वतः चोचीनेच तारलं होतं..
चोचीनेच तारलं होतं..!
--------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment