Powered By Blogger

Sunday, January 24, 2016

उद्धवा आणि राध्येय..! :-)


♥ क्षण..! ♥

उद्धवा आणि राध्येय..!

उद्धवा! कवितेची व्यथा तुलाही का न कळावी?
राध्येय! जो वाचतो आहे त्याचीच तीही व्हावी..!
उद्धवा! सांग मला, काय चुकलं माझं? कागदाचा उद्धार करुन शब्दांची आभूषणे देत आलो मी! कित्येक दागिने शब्दांनी कागदावर घडवत आलो मी! शब्दांचा नजराणा बहालही केला मी कागदावर आणि कागदाला महत्त्व शून्यातून महत्त्वपूर्णही करत आलो मी, बोल उद्धवा बोल...
राध्येय! कागद जरी कोरा होता, तो मुका होता! तुझ्या शब्दांनी त्याला वाचा दिली म्हणून तो महत्त्वपूर्ण झाला! तू अलंकारांची शब्दाभूषणे नजर केली कागदाने हसत हसत तीही स्वीकारली! तू कागदाच्या अंगा-अंगावर लेखणीच्या टोकाने कित्येक बारीक घाव कोरलेस सांग जराही का कागदाने कुरकुर केली? तू लिहिलेला प्रत्येक शब्द कागदाने जपून ठेवला पिढ्या न पिढ्या पुढेही नेला! कधी वि.सं., कधी ग्रेस, कधी ग्रेट भट, कधी कुसुमाग्रज आणि कधी विं. दा., तर कधी नुसतीच निंदा! प्रत्येकाने स्वतःच्या वेगवेगळ्या शैलीने कागदावर शब्दांचे आभूषणे मढवली, घडवली, अगदी कागदावर नटवलीसुद्धा तेव्हाच शब्दातून मन जिंकण्याचे यश ते अजरामर घेऊन गेलेत! आजही कशाच्या आधारावर जपलाय तुझा शब्द इतिहास? कागदाच्याच ना? काळ आधुनिक झालाय ऑडिओ, व्हिडिओ, रेकॉर्ड्स यांचा कॉमन बेस काय? कागद! शब्दांचा आधार काय? कागद आणि कवितांचा जन्म गाव काय? कागद! नो मॅटर माध्यम कोण आहे? शब्दांतून श्रोत्यांपर्यंतचा दुवा हा फक्त कागदचं आहे! जपून ठेवू नकोस कागदाला, चुरगाळेल! घडी करुन ठेवूही नकोस, हरवेल! हा कागद घे, भर आणि पुढे जाऊ दे.. छानसे पुस्तक म्हणून कागदांनाच हातात पडू दे! शब्दांच्या आभूषणांनी नटवशील तेव्हाच तर तुझ्याही कागदाला मोल आहे..!
उद्धवा! कळले मला, माझा जन्मदाता कागदचं मला तारतो आहे! माझा एकएक श्वास कागदावरच खेळतो आहे! शब्दाने भरुनही पुढचा कागद मला कोरा करतो आहे. कारण माझ्यानंतर माझा कागद शेवटीही कोराचं उरणार आहे! कुणाआधी माझा कागदचं मला कोरा करणार आहे. हेच माझ्या आयुष्याचं कागदाला दान आहे! मी कितीही शब्दांनी भरुन कागदाने मात्र कोरंच राहणं आहे..!
--------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

(यात या पामराणे थोर कवी व लेखकांची नावे थोडक्यात व तुटक वापरलीत ती निव्वळ या संवादांची आवश्यकता म्हणून विडंबन आणि विटंबन करण्याचा कुठलाही प्रयत्न यात नाही जर तसा आढळून येत असेल किंवा जाणवत असेल तर तो क्षमाप्रार्थी समजावा..!)

No comments:

Post a Comment