"वेदनांचे प्रकार कारावेत आता वेगळे म्हणुन वेदनांच्या प्रकारांची वेगळी सुरुवात करतो आहे..." एक प्रयत्नच करतोय वेगळेपणा जपायला :-)
प्रकार क्र. 1) काटा..!
अनवानी पावलांनी चालतांना
टाचांना तुझे अस्तित्व रे जाणवले,
वेडा-वाकडा चेहरा करुण माझा
काट्याने वाटेवर असे स्वागत केले...-------------- मृदुंग
वेदना प्रकार क्र.2) शब्द..! :-)
चारचौघात औपचारीक
आपुलकीने पानउतारा,
शब्द ओठांतून पसरवे
भुतकाळी चुकांचा पसारा...----------- मृदुंग
वेदना प्र. क्र. 3) स्वप्न :-)
भुरळ पाडून आयुष्य जगण्याची
एका क्षणात उध्वस्त करूण जाई,
सुगंध दरवळवून प्राजक्ताचा मनी
उघड्या डोळ्यांतच कोमेजून जाई...------------- मृदुंग
वेदना प्र. क्र. 4) वेदना :-)
जखमा सहज दिसतात डोळ्यांना
कुठे कुणाला कळतात मनातल्या वेदना,
कळ फक्त स्वत:लाच समजत असते
अन् उगा जग देते सहानुभुतीची संवेदना...------------- मृदुंग
वेदना प्र. क्र. 5) मरणं
मन मारून जगावे लागते इथे
मागुनही मरणं काही मिळत नाही,
उदंड आयुष्याचे करावे काय
जिथे मनाचे अस्तित्व उरत नाही...-------------- मृदुंग
वेदना प्र. क्र. 6) नशिब :-)
हातातून तोंडाशी आलेला घास
अचानक हिरवून घेतं माझं नशिब,
तरी कष्ट थोडे कमी पडले असतील
म्हणुनच माझे नशिबही कमनशिब...--------------- मृदुंग
वेदना प्र. क्र. 7) अंधार :-)
साध सुरळीत आयुष्य चालू असत
बदल म्हणुन उगा दाटतो दु:खाचा अंधार,
सावरायचा प्रयत्न आपण करतोच
पण क्षणभर उजेडही मिळतो तेव्हा उधार...-------------- मृदुंग
वेदना प्र. क्र. 8) आठवण
नाही म्हणटले तरी मनाचे कप्पे पटकन
उघडून कुणाचा चेहरा डोळ्यासमोरी येतो,
आठवून त्या धुळ साचलेल्या आठवणी मी
उगाच पुन्हा वेदनांच्या कळा साहत बसतो
...-------------- मृदुंग
वेदना प्र. क्र. 9) जगणं :-)
खोटी आशा उरी बाळगत
खोटी स्वप्ने एकाकी जगणं,
एका क्षणापुरता का असे ना
भुतकाळालाच सतत मागणं...-------------- मृदुंग
वेदना प्र. क्र. 10) अपेक्षा :-)
आजवर स्वत:च्या सोबत इतरांच्याही
अपेक्षा मी तर कायम भंगच केल्या आहे,
तरी उगा आस लावून असतात लोकं
ज्यांच्या कर्तव्याचा मी त्याग केला आहे...-------------- मृदुंग
वेदना प्र. क्र. 11) स्वभाव :-)
आपुलकीने चौकशी करतात माणसे
काय झालंय पण उत्तर देता येत नाही,
स्वत:चे दु:ख असतेच प्रत्येका जवळ
म्हणुन माझ्या स्वभावाला जमत नाही... --------------- मृदुंग
वेदना प्र. क्र. 12) आसंव :-)
वेदनांची उठलेली असह्य कळ
माझ्या आसवांना आमंत्रण देतात,
अन् माझी माणसेही उगाच मला
हळव्या स्वभावाचा बोलून घेतात...------------ मृदुंग