:-)
पाहता पाहता तुला
पाहायचे गेले राहून,
दिपलेले डोळे माझे
जातो आता कायमचे बंद करुन,
चालता चालता सोबत
चालायचे गेले राहून,
तुझ्या अश्रूंची भिजरी
पायवाट आता जातो फक्त तुडवून,
बोलता बोलता तुझे
बोलायचे गेले राहून,
आठवतात ते क्षण
म्हणून आता काढतो मी फक्त लिहून,
जाता जाता जाशील
तू माझे शब्द वाचून,
प्रेमाचे अस्तित्व माझे
लाजाळूच्या पानात ठेवतो मी मिटवून..!
------------------------- मृदुंग
13/09/2013
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment