एक चिमुरडी...!
आई-बाबा दोघे कामावर गेली
एक चिमुरडी एकटी एकाकी घरी राहीली
काय करावे काय नाही करावे
ऑफीस म्हणजे काय(?)विचारू लागली
इवल्या इवल्या डोळ्यांनी ती
काय उत्तर मिळते वाट पाहत बसली
कुठे असत कस असत काम
का करावे लागते बंर विचारू लागली
एकाकी कोवळ्या कळीला असे
घरी कुलुपात कोंडून दिवस जावू लागली
हिरमुसली रडकुंडीला ती आली
देव बाप्पाला जाब प्रपंचाचा मागू लागली
सहवास मिळवायला खर्च कशाचा
दोन जास्तीच्या पैश्यामुळे एकटी पडली
मागायचे तर आहेच आई बाबांना
उगाच फाजील हट्ट म्हणत दोघं ओरडली
समजुन कसे सांगायचे असते आता
वेळे सोबत वयाची चाके फिरत राहिली
सहवास मिळाला नाही द्यायचा कसा
सोपे गणित प्रत्येकाला विचारू लागली
अपेक्षांचे ओझे अन् कामाचे तान फक्त
येव्हढेच ती आयुष्यात आहे का शिकली
दिवसभर काम अन् रात्रभर आराम
त्याला ती घर उगाच का म्हणू लागली
आठवड्यातला एक दिवस पुरेसा
सहवासाला कळीचे अशी वेळ जात गेली
कोवळ्या वयात प्रत्येक दिवस क्षण
केविलवाण्या नजरेनेच ती मागत आली
एक चिमुरडी एकटी एकाकी घरी राहिली...!
---------------------------- मृदुंग
No comments:
Post a Comment