उसवलेलं..!
आसवांच्या धाग्याने बांधलेला
वेदनांच एक टाकं मी उसवलेलं,
दिसू नये कुणा हे आयुष्य माझं
विस्कटलेल्या विणेवर बसवलेलं,
जखमेवर लटकलं कातड माझं
त्यावरही सहज तुझं नाव लिहिलं,
जेव्हाही येतेस वाचून जातेस तू
उगाच खपली मन म्हणत राहिलेलं,
आठवांच्या रेषांवर आठ्या पाडत
माझ्या राखेला दुषणं कुणी दिलेलं,
बघुन घे एकदा हे शरीर भाजलेलं
जागो जागी शिवलेलं सारं उसवलेलं...(मी)
.
© मृदुंग
No comments:
Post a Comment