लेखणीच्या टोकावर..!
कधी जगणं कधी मरणं
कधी नजर कधी गजर
कधी तुटणं कधी लुटणं
कधी वावर कधी सावर
कधी आठवणं कधी साठवणं
कधी उधळणं कधी चाळवणं
कधी बरसणं तर कधी तरसणं
कधी कोसळणं कधी वाळवणं
कधी वेदना कधी संवेदना
कधी प्रतिक्षा कधी अपेक्षा
कधी वाट कधी अंतरपाट
कधी खाणाखुणा कधी ना
सारे सारेच मांडले कागदाच्या चौकावर
उरले तरी काय लेखणीच्या हो टोकावर
.
© मृदुंग
No comments:
Post a Comment