Powered By Blogger

Friday, January 23, 2015

आपणच..! :-)

आपणच..!

फसणारेही आपणच
फसवणारेही आपणच,
हसणारेही आपणच
हसवणारेही आपणच,
पाहाणारेही आपणच
दाखवणारेही आपणच,
थांबणारेही आपणच
चालवणारेही आपणच,
शोधणारेही आपणच
सापडवणारेही आपणच,
बरसणारेही आपणच
तरसवणारेही आपणच,
सावरणारेही आपणच
कोसळवणारेही आपणच,
वदणारेही आपणच
वदवणारेही आपणच,
उधळणारेही आपणच
उधळवणारेही आपणच,
जळणारेही आपणच
जळवणारेही आपणच,
आपणच... आपणच...
फक्त आपणच... स्वत:चे...!
.
© मृदुंग

शुभ रात्री...! :-)

No comments:

Post a Comment