क्षण..!
काठ..!
आयुष्य हाही एकाकी काठ आहे. मित्र, मैत्रीण, कुटूंब, नाते याचे बेट आहे. प्रेमाची नौका असते वाटते एकच. ज्यात काही प्रवासी प्रवासाला असतात. आभाळ घर होतं अन् लाट दारं होतं. काठाचे किनारे मग खिडकीच वाटत. काही पाहूने म्हणून अनोळखी पाखरे येतात. काठा शेजारील झाडावर थांबतात. चावडीच त्यांची किलकिलाटात स्वभावाचे उणे-दुणे सांगतात. निश्चिल असतो तो काठ स्विकारत प्रत्येकाला. आल्या गेल्यांची आठवण जपायला. कधी सोहळे कधी मातम मनवले. कधी अंतर वाढवले तए कधी जवळ आणले. शेवटी काठावरच काही बेटे जोडले. तट म्हणून किनारे तुटले. काठावर या एकदा तरी कुणी ना कुणी येत गेले. आयुष्य एकाकी काठच आहे पदराचा, मायेचा, प्रेमाचा अन् क्षणांचा.
.
© मृदुंग
No comments:
Post a Comment