Powered By Blogger

Friday, January 23, 2015

वेदनांचा गणपती..! :-)

समस्त गणेश भक्तांची माफी मागून...!

वेदनांचा गणपती मी यंदा बसवावा म्हणतो
माझ्या जखमांच्या मुशक त्याला शोभावा म्हणतो,
तिस तोळ्यांची काय अमुल्य स्वप्नांची रास मांडावी म्हणतो
आसवांची रांगोळी काढून गौरीचे स्वागत करावे म्हणतो,
लाही लाही होता तनाची माझ्या शांततेची दुर्वा वाहावी म्हणतो,
कधी नवसाला पावला नाही म्हणून यंदा पावसाला त्याचे मुकूट करावे म्हणतो
अकरा एकवीस खचलेल्या मनातले मोदकांचे प्रसाद बनवावे म्हणतो
जल्लोश दर वर्षी केला यंदा स्वागत आक्रोश करुन करावा म्हणतो,
झालं-गेलं पापण्यात ओलं राहिलं हसत मुखाने नमन करावं म्हणतो
नेहमी मागायला पसरणा~या माझ्या हातांनी पयलं न् शेवटचं वंदन करावे म्हणतो...!
.
मृदुंग

क्षमा प्रार्थनीय...!

No comments:

Post a Comment