क्षण...!
बस चालत राहिलो...!
वेदनाच्या रस्त्यावर मी
वेदनांचे घर शोधत राहिलो,
क्षणभर विसावा घेण्यासही
वेदनेची सावली मागत राहिलो..!
का कुणास ठावूक आज मी फक्त चालत राहिलो, जायचे कुठेही नव्हते मला तरी एक प्रवासी मी बनून गेलो, विव्हळलो गहिवरलो ओठांनी मात्र हसत राहिलो, जड झाल्या पापण्यांनी सरता दिवस पहात राहिलो, सांजेला करुण विनंती रातीला लांबवत राहिलो, ओंजळीत एकवटून आठवांना पावसाच्या थेंबांच्या पायातील घुंगरु बांधत राहिलो, अश्रूंचा घेवून श्रूंगार वेदनेला सजवत राहिलो, उसणवारीच्या दुकानात वेदनांना उधारीणे विकत राहिलो, झाल्या गेल्या भुतकाळाचे श्वासांनी व्याज वाढवत राहिलो, वेदनांचे अश्रू लपवण्यास कुस बदलत राहिलो, वेदनांच्याच अंथरूनात स्वत:स विस्कटत राहिलो, स्वप्नं काय पाहू स्वत:च असा तुटत राहिलो, किती दुर जावू अजुन श्वासांच्या अंतरावर राहिलो, क्षितीजापार सारे आज उधळीत रंग राहिलो, सोबत असुनही स्वत:ची आज एकाकी राहिलो, वाळूत उमटलेली पावले माझी पुसत राहिलो, वेदनांनाच वेदनांचे घाव घालत राहिलो, वेदनांचेच वेदनेने गाव जाळत राहिलो, वेदनेचेच नाव वेदनांनी लिहत राहिलो, वेदनांचाच भाव बाजारात वाढवत राहिलो, आज बस चालत राहिलो... चालत राहिलो...!
-------------------- मृदुंग
No comments:
Post a Comment