Powered By Blogger

Friday, January 23, 2015

मिस्तर अमेरिका..! ;-)

क्षण..!

हॅल्लो मिस्तर अमेरिका..!

हाय कासायेस..? अरे बापरे..! माहित आहे फार चिडलायेस ते.. पण खरच आज तुझ्या भेटीसाठी केलेले सारे प्रयत्न निशिफळच ठरले रे.. योगायोगाने भेटू ठरवलं होत आपण.. पण काही योग जुळून यायला खरच वेळ लागतो..माहित नाही तुझा राग आता कधी जाईल.. अबोल तू राहू शकत नाहीस.. आठवण काढल्याशिवाय स्वस्थ तू बसू शकत नाहीस.. हा पेशंट तुझा माहित आहे तुला किती त्रास दायक आहे.. पोकळीक अन् राहून गेलेलं खात राहिलच मनात... पण चालायचेच कि रे... दोन वर्षापासून आखले होते बेत या दिवसाचे..पण तुला माहित आहे मी किती धडपड्या आहे ते... पंधरवड्यापासून गळ्यात पाय अटकवून हिंडतोय.. काल असह्य वेदना झाल्या नि आज थेट दवाखाण्यातल्या बेड वरुन तुला मनवतोय... सांगायच नव्हत तुला तस म्हणून माझा तो खोडकर सरळ H उलाटा ! पाठवत आहे... जरा वेळ बोललास फोन वर पण माहित आहे किती मिस् केले आहेस तू.. पहिल्याच रिंग वर सगळा आवेग न् उसने अवसान गळूनच गेले तुझे.. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवली आहेस.. डारलींगची सुद्धा आठवण काढलीस.. भेटू रे कधी तरी आता माहित नाही लंडन वरुन तुझी पाऊले कधी मायदेशी परततील.. आता तर गर्दी मुळे आवरते घेतलेस रागाला.. पण जाणवलं किती तरसला होतास भेटायला.. तुझा रागही रास्त आहे म्हणा.. देशील ती शिक्षाही मान्य आहे मला.. अजुन काही आठवत नाही मी आता.. तुझं माझं आहेच ना क्षणांत... आवडणार तुला नाहीच तरीही "क्षमाप्रार्थनिय"..! काळजी घे..! :-)
.
© मृदुंग

No comments:

Post a Comment