Powered By Blogger

Friday, January 23, 2015

स्वप्न..! :-)

क्षण..!

स्वप्नं..!

दिवसभरात जग पाहात असलेल्या डोळ्यांना, मिटल्यावर कल्पनांच रोपटं दाखवणारे असते स्वप्न. मनासारखं असावं काही ते घर असते स्वप्न. आपल्याला हवी तिच, पाहिजे तोच मार्ग असते स्वप्न. वास्तवात वाटा बंद करण्याचे कारण असते स्वप्न. रोजच पापण्यातल्या आसवांना तारण असते स्वप्न. मिटल्या डोळ्यातला उभा आयुष्य असते स्वप्न. कधी लुभावणे तर कधी अचंभित करणारे असते स्वप्न. श्वासांची गरजही बनते स्वप्न. आभासाचे जग म्हणजे स्वप्न. स्वप्नांना वय कुठे असतं. कितीही उन्हाळे पावसाळे पाहिल्यावर, स्वप्नातल्याच सरीत मन चिंब भिजतं. जाग येते तेव्हा ओठांवरचे स्मित असते स्वप्न. काहीही झालं तरी पापण्यांचे ओझे असते स्वप्न. स्वप्नांचा कोणी भागीदार नसतो. आपलाच एक जोडीदार असतो. बंधणात गुदमरत आलेला मोकळा श्वास असते स्वप्न. चांगले तितकेच वाईट असते स्वप्न. नेहमीच स्विकारावे लागते वास्तव. तरी मन म्हणते ते स्वप्न पाहावं, तसच जगावं. स्वप्नातला तो / ती स्वप्नातच राहून जातात. स्वप्न स्वप्नच प्रत्येकाचे राहून जातात.
.
© मृदुंग

No comments:

Post a Comment