क्षण...!
कुणी यावे माझ्याही मिठीत
अन् ठेवावे स्वत:च्या मुठीत,
ती बंद दार उघडतो पुन्हा मी
बस निजवावे प्रेमाच्या कुशीत,
एक सुरेल अंगाई माझ्यासाठी
गुणगुणावी ओठातल्या स्वरात,
शांत व्हावा वादळ माझा क्षणात
न् चालावे मी मोकळ्या गवतात,
स्वप्न पाहातो ते एक चांदण्यांत
येवून भेटशील तू पुन्हा लाटांत,
सावलीसारखी तू सोबत वाटांत
न् मोकळ्या केसांच्या अंधारात,
गुंतून तुझ्यात भासे क्षुद्र चांदरात,
पाहून पुन्हा ते एक जग नयनात
काय हवे मला आता आयुष्यात(?)(!)...------------------------ मृदुंग
शुभ रात्री... बेधुंद स्वप्ने...!
No comments:
Post a Comment