क्षण..!
मराठी सुफी (प्रयत्न क्रमांक : चार)
त्याच्या आयुष्यात तिचे प्रेम एकाच वाटेने आले अन् आल्या त्याच वाटेने निघुनही गेले. ती निघुन गेल्यावर सैरभैर तो झाला होता. आयुष्यात येणा-या प्रत्येक 'स्त्री' मध्ये त्याची प्रेयसीच तो शोधत होता. कुणी तरी असावे त्याच्या जवळचे त्याच्या हक्काचे येव्हढेच काय त्याच्या मालकीचेही. एक दोन ठीकानी प्रेमात तो पुन्हा पडला. खंर म्हणजे त्याच्यावर प्रेम करण्यासारखे बरेच काही होते. त्याचाही हट्ट बघा ना मिळवायचे त्याला नव्हतेच कुणाला. प्रेमाची बाराखडी फक्त शिकवायची होती ज्यांना त्याने ती शिकवली ती व्यक्ती मग त्याच्याशिवायही आयुष्यात मजेत राहिली. उणीव रितेपणा येव्हढेच काय अपुर्ण आहोत आपण असेही कुणाला वाटले नाही. त्याच्या आयुष्यातले ते सातवे-आठवे प्रेम प्रकरण असेल. प्रकरण??? होय प्रकरणच...!
पहिल्या पावसाळ्यातला तो होता
पहिल्या सरितली अल्लड ती होती
जगावेगळे ते दोघे जिथे तिथे होती
एकमेकांचे नसुन स्वत:चे पुर्ण होती
ती ओळख कोळोख दुर करायला झाली
अंधारल्या खोलीत दिव्याची जागा झाली
भिती तरी वाटली ही ओढ महागच पडली
स्वप्नांची किंम्मत श्वासांनी मोजली गेली
हसला तो तिचा हात धरुन चालला
थांबुया इथेच तो लगेच बोलून गेला
बिथरली नाही हसतच निरोप घेतला
जाता जाता माझी मी तू देवून गेला
नाते ते एक तोडून बरीच नाती ठेवून गेला
त्याचा स्वार्थसोडून एकटा तो होवून गेला
असेच भेटले हसुन तो ओळख देवून गेला
त्या उधान लाटेचा तो किनारा बनून गेला
जोगता बनून तो दारोदारी हिंडत राहिला. अवतार त्याचा पाहून कुणी हळहळत राहिला. काही हवेय का? विचारले कुणी तर त्याचेच सर्वे तो देवून गेला. दु:खाच्या काट्यांवर त्याच्या सुखाची फुले उधळून गेला. कदाचित त्याचे चांदणे तो आभाळावर विणून गेला... तिच्यासाठी..!
(ती)
तुझ्या या बगीच्यात येते हल्ली मी
उमलल्या फुलात तुला पाहाते मी
गंध घेवून तुझा भिंतीत दरवळते
घर-दार माझं ते सुखात मी ठेवते
त्या तुळशीला रोज पुजत असते
तुझं रोपच ते माझ्या घरात वाढते
या दारावर एक दिवस येशील तू
त्या उंबरठ्यावर रोजच बसते मी
मन वेंधळे माझे म्हणे फक्त तुच तू
त्या काठावरची लाटच बनते मी
तुझी ती लाटच बनते मी सख्या रे...
बरेच दिवस होतात तो तिच्या सुखात ढवळा ढवळ करायला जात नाही. तो येणार नाही म्हणून तिच त्याच्या जवळ जाते. कसा आहेस अन् बरेच काही तोडके उत्तर ती घेवून जाते. अबोला त्याचा ती जाणून घेते. तो हसतो स्वागत करुन दार बंद आहे म्हणतो. ती ही तत्पर खिडकीतली मी सर आहे म्हणते. पाहिले नाहीस तू तरी माझ्या थेंबांचे टपटपणे टिपतोस ना तू? मान्य का करत नाहीस आजही माझ्यावरच प्रेम करतोस तू...
(लाटेचे खळखळते हसणे अन् त्याचे आसवांना पुसणे)
का आलीस तू, का गेलीस तू
पुन्हा इथेच कशी चुकलीस तू
तुझ्याशिवाय ही मी खुश आहे
प्रेमाच्या कागदावर अंशत: आहे
माझा आहेच कि बघ मी स्वत:चा
तुझा असुन नसुन काय कामाचा ?
जा तुझी तू आलीस तशी पुन्हा
बघीतले कुणी तर वाटेल गुन्हा
प्रेमाचा पाऊस चारी दिशात माझा
एक तुच अशी नाही आयुष्यात माझ्या
तुझ्या नंतर छे! तुझ्या आधी सावरलो
बघ गुलाब कसा वाटतो बगीच्यात माझ्या
पदर तोंडाला लावून ती निघुन जाते. चौकटी बाहेर आलेलं तिचे पाऊल माघारी घेते. का असा जळवतो अन् वागतो माझ्याशी तो विचार करत राहाते. तुळशीला पुन्हा पाणी देत त्याचा विचार करत राहाते. तो मात्र हसत राहातो. वेड्यांच्या दवाखाण्यात वेडा म्हणूनच असतो. बाहूली मिठीत घट्ट धरुन खुप रडत राहातो. उभा जग मग म्हणतो "दोन दिवसाचे प्रेम वेड लावून गेले.."..!
.
---------- समाप्त ----------
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:
Post a Comment