Powered By Blogger

Sunday, January 11, 2015

एकांकीका..! :-)

:-)
क्षण..!

एकांकीका..!

(स्थळ - तलावाचा काठ. पात्रे - लाटा, मी, बुद्धी आणि मन)
उनाड मुजोर वारा, लाटांचा खळखळाट.
मी : श्या! रोजचे झालेय काही एक सुचत नाहीये. लिहून लिहून आता लिहावे तरी काय माणसाने?
बुद्धी : काही तरी आंबट लिही, उत्कंठा वाढवणारे लिही.
मन : चल रे भलतेच ऐकून लिहू नको. बाल मनाचे विचार करुन लिही.
लाटा : माझ्यावर लिही ना! दुरवर घेवून जाईल. मस्त फिरवून आणेल तुझ्या शब्दांना
मी : गप्प बसा रे ! किती कलकल. एकदा तरी तुम्हा तिघांनी एका विषयावर एकमताने शिक्का मोर्तब केलाय का?
बुद्धी : मी तर करते ना या मनाचे आणि लाटांचे बघ आता तुच स्वच्छंद अन् मोकळ हवे असते. रुचकर नसले तरी रुतणारे हवे असते. नको तिथे घायाळ होवून बस्कन मारुन बसायला हवे असते.
मन : अहाहाहाहा! बोथट बुद्धी आंबट लिहून कशाला लोकांना नको तिथे नको तेव्हा अवघडवून सोडायचे? निदान जागच्या जागेवर तरी ते बिचारे मला जवळ घेवून बसतात म्हणून तू जळतेस मला.
लाटा : जरा दुर काय गेले या दोघांचे झाले का सुरु? आता तो बिचारा मी बसेल तोंड पाडून मुकाट ऐकत.
मी : (स्वगत) काय सुचले मला न यांना विचारायच्या फंदात पडलो? (उघड) डोळ्यांनी पाहिले एक पान गळतांना त्यावर लिहू?
बुद्धी : वय झालं गळून पडलं. तसही पिकल्या पानांचा झाडाला काय उपयोग? हिरव्या पानांतच तो मस्त दिसतो. लाईक अभी तो मैं जवान हूं.
मन : आवरा ! जेव्हा बघावं तेव्हा आंबट अन् चावटच विचार का म्हणून? पिकल्या पानाचे ते प्रेत उचलून जावू या कि स्मशानात असेही चार जन आहोतच आपण.
लाट : किनारा सोडून मी कुठेही येणार नाही. आय लव्ह माय बेस्टी.
बुद्धी : हे अस किनारा अन् लाटेला फाजील चाळे करतांना पाहिले तर आवरावं कसे मी स्वत:ला? पान गळलं शोकांतीका झाली आणि हिला बघा किना-याची मिठी सुचली.
लाट : किती त्रागा गं तुझा बुद्धी तू विचारांच्याच आंबट कल्पनेत खुश राहा.
मन : माझे बाल मन. मी रडू? मी रडू ?
बुद्धी : नको नको नको माझे विचार वाहात जातील.
लाट : बिन्धास्त ! किना-याची सैल झालेली मिठी मगर मिठी होईल.
मी : (स्वगत) शिवी हासडतो तिघांना (उघड) ठरले मग काय लिहायचे?
बुद्धी, मन, लाट : (एकत्र) काय?
मी : काहीच नाही..!
------------समाप्त-------------
.
© मृदुंग

No comments:

Post a Comment