बेधुंद...!
ऑफीस मध्ये बसलेले
उगाच कामात हो गुंतलेले,
सवड काढून या शब्दांना
वाचून ओठांनी हो हसलेले
धुंद मन धुंद क्षण
चिंब मन ओले आंगण
पावसाच्या थेंबांची
स्मरली हो आज पैंजण
पानापानातली सळसळ
गारव्याने रोमांचीत कातळ
बेभान मी बेफाम मी का
रिती आभाळाची हो ओंजळ
----------------------- मृदुंग
No comments:
Post a Comment