क्षण..!
विसरलोच होतो...!
मी काल मध्येही जगत नव्हतो अन् उद्या मध्येही जगत नव्हतो, मी आज मध्ये जगत होतो! होतो...? आहे. जो मिळाला तो, जो गवसला तो, जो भरभरुन जगता आला तो प्रत्येक "क्षण" आज मध्ये जगून मी उपभोगला नव्हे, जमेल तसे जगत आलो. आयुष्य यालाच म्हणतात ना..? भुतकाळ काय भविष्य काय, आज छान गेला तर उद्याही छानच जाईल, राहिले काल तर ते ही सुखदच आठवेल छे! आठवत. काल आणि उद्या मध्ये काहीच नसत जे काय ते आज आत्ता इथे :-) काल मध्ये आठवण बनली, उद्या मध्ये भविष्य अन् आज मध्ये तो फक्त "एक क्षण". जगायला अजुन काय हवे? काल ही रिता राहिला उद्याही रिता राहणार पण आज मध्ये हा "क्षण" भरभरुन आहे. कालसाठीही न् उद्यासाठीही... :-)
"काल अन् उद्या मध्ये ती धुंदता नाही, जी आज मध्ये क्षणांची बेधुंदता आहे"..!
.
© मृदुंग
No comments:
Post a Comment