Powered By Blogger

Monday, January 12, 2015

मराठी सुफी (प्रयत्न क्रमांक पाच)

क्षण..!
मराठी सुफी (प्रयत्न क्रमांक पाच)
वसंताचे दिवस हे मोजक्या दिवसांवर आता गुढी पाडवाही आलाय. मराठमोळ्या संस्कृतीतला नविन वर्ष आता सुरु होणार आहे. येणारा-जाणारा दिवसच तर असतो. या दिवसात माझा मी कितीसा असतो? ठरवलं! नाही नाही ठरलं आहे. माझा मी उलघडून पाहायचा. आनंद कोणी देत नाहीच म्हणून दु:खही आता कुरवाळत बसायचे नाही. पुढे जायच्या आधी होतेच असे मागे झालेय ते समोर येतेच. पळ काढून आता अजुन किती लांब निघून जायचे? काही गोष्टी मनात आपल्यासोबतच येतात. जवळ घ्यायचे नाही ठरले आहे. उपरे-परके शेवटी व्यक्तीच झाले आहे. मन आहे ना जवळ मग आता मानाचेच कारभार करायचे आहेत..!
(मी)
कसा दुर निघून आलो मी
कसा एकट सोडून आलो मी
कुणाचा असुनही आयुष्यात
असा परकाही का झालो मी
एक सल मला सलते आहे
पुर्ण असुन अपुर्ण वाटते आहे
माझा मलाच पारखा होतो
माझा मी का सखा झालो आहे
येवून शेवटी तुझ्या वाटेवर
ते घर माझंच मी जाळून गेलो
सोपस्कार होते प्रेताचे तर
मेल्यावरही श्वास घेवून गेलो
वेदनेच्या वर्तुळात जखमांना
मनातले तर रकाने देवून आलो
कणभरही अस्तित्वच नव्हते
क्षणातले घर रिकामे करुन आलो
(ती)
बरे झाले सख्या तू सावरला आहेस. तुझी काळजी घेणारे इथे बघ किती आहेत. मी असतेच तुझ्यासोबत पण तुला आता ते आवडत नाही. तुझी मी नाही म्हणून राग तुझा आहे. मला विसरलास ठीक आहे पण तुझा रंग तेव्हढा मला लागला आहे. तू तर कलाकारच आहेस तालिमीत परिपक्व झालेला. तुझी श्रोता मी ही आहे. पण तुला कुठे जगापासून वेळ मिळालेला आहे? आज तुच तर तुझं एक जग बनला आहेस. तुझा एक जग मात्र मी तसाच जपुन ठेवला आहे..!
मागे वळून पुन्हा
पाहू नकोस कधी तू
वाटेतल्या अडचणीत
डगमगू नकोस कधी तू
दाटून तुझ्या मनात
आले कधी रे जरी मी
हेतू नसेल माझा तेव्हा
करायचे तुला रे जखमी
आजही तू नकळत
मला सावरुन जातोस
बघता रोखून मी माझा
पसारा आवरुन जातोस
विचलीत होवून तरसते
स्वत:वरच मी अशी बरसते
शोध घेत येते मागे मागे
माझी सावली एकटी असते
(मी)
ओल आली कागदाला
वाटलेच होते तू आहेस
पुन्हा वाचूनच शब्दाला
आसवं ओघळली आहेस
पाहिले क्षणभर अन्
नाम निराळा झालो
टापटीप होती कधी
आज गबाळा झालो
कदाचित आज मी
पुन्हा दुबळा झालो
तुझा सोडून माझा
मीही सगळा झालो
आवकाश होता जरा
थोडा कासाविस झालो
सावरुन स्वत:ला मी
घेवूनही एकट्यास गेलो
पाऊले मागे पडली नाही, नजर मागे वळली नाही. बिंदूत आले सगळेच माझ्या वर्तुळात फार उरले नाही. चालत राहातो बोलत राहातो. माझा मी फक्त एकटाच असतो. हसतो-रडतो स्वत:शीच भांडतो. प्रेमात तुझ्या मला सारा जग वेडा म्हणतो..!
.
------- समाप्त -------
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment