♥
♥ क्षण..! ♥
एका माफिया गुंडाचे प्रेम vs लेडी दबंग..!
महागड्या मॉलाचे उद्घाटन प्रसंगी झाली नजरा-नजर..!
डावा हात असलेल्या पंटर कडून मग काढली इत्यंभुत माहिती तिच्या बद्दल..!
शार्प-शुटर पासून किडनॅपिन्गचे प्लॅनिन्ग झाले सुरु..!
गुंड जेव्हा प्रेमात पडलाय नजराणा म्हणून ॲटोमॅटिक पिस्तुल दागिना वाटलाय..!
स्टाईल मध्ये आग ओकणा-या लाल डोळ्यातून प्रेमाची धमकी दिली जाते..!
लहरी गुन्हेगार ती त्याचा पहिलाच प्रस्ताव बुलेट पृफ जॅकेटात धुडकावून लावते..!
पुन्हा नजरेत प्रेम भरुन दुसरा प्रयत्न होतो...
उभ्या मिसाईलीला हात बॉम्ब नजर करतो...
विस्फोटक पदार्थ स्वत:च्याच जुळ्या भावाला पाहून घाबरते...
बॉटलभर पाणी त्याच गुंड्याच्या मुखावर फेकून अपमान करते...
हताश निराश झालेला तो गुंड शेवटी आजवर केलेल्या प्रत्येक गुन्ह्याचे सगळे पुरावे स्वत:च देऊन छाती फुलवून ताठ तिच्यासमोर उभा राहातो...
रिटर्ण गिफ्ट मध्ये उत्तर देण्याची तिची वेळ येते. ती लाजत नखरे करत शिताफिने त्या गुंड्याला प्रेमळ नजरेच्या जाळ्यात गुंतवून डोळे बंद करायला लावते.
हात हातात घेवून त्या माफियाचा अलगद कायद्याची बेडी गुंफते...
पोलीस वाली लेडी दबंग गुन्हेगारीचा असा नायनाट करते..!
मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment