धोतर डांस..!
डोक्यावर पुढारी टोपी चढवून
पायात कोल्हापुरी चप्पल घालून
कप्पाळी हो भगवा टिकाच लावून
कोपरापासून राजकारणी नमस्कार करवून
सतत घोटाळ्यांचे स्वत:ला आश्वासन देवून
करणार आज
धोतर डांस... धोतर डांस... धोतर डांस... धोतर डांस..!
देशी गुत्त्यावर विलायती रिचवून
आया बहिणीच्या शिव्या हासडून
माजलेल्या बैलाला आसूडानं झोडपून
भ्रष्टाचारीच्या हो तोंडावर काळच फासून
करणार आज
धोतर डांस... धोतर डांस... धोतर डांस... धोतर डांस..!
सामांन्यांच्या वाटेला जो जाईल
त्याची अवस्था अशीच हो होईल
शांततेचा गैरफादा असा जो घेईल
विना पाण्याने त्याची धुलाई होईल
ऑल द कोंडके फॅन.... टाळ्या
लक्ष्मिकांत विनोदाची शान.. टाळ्या
करणार आज
धोतर डांस... धोतर डांस... धोतर डांस... धोतर डांस...!
काना कोप~यात पुन्हा चौघडे वाजतील
उत्तूंग नभात असे मृदंगाचे नाद घुमतील
अभिमानी मराठी तितूके जगी मिरवतील
लोक कल्यानासाठी पुन्हा राजे हो येतील
बाजी प्रभू पुन्हा खींsssड हो लढवतील
तळपती तलवार स्त्रीयांच्या हाती हो देतील
लुटायाला आब्रू सांगा कुणाची हिंम्मत होईल
जिजाऊच्या शिवबाची आन... त्रिवार मुजरा
झुकवणार नाही पुन्हा मान... अभिमान
करणार आज
धोतर डांस... धोतर डांस... धोतर डांस... धोतर डांस...!
.
© मृदुंग
शुभ दिन..!
No comments:
Post a Comment