♥
♥क्षण..! ♥
अनाहुत (पाऊस)..!
हल्ली पाऊस कधीही येतो
मी बोलवले नसतांना'ही,
विचारावे तू पाठवलेस का
तर ओली थेंब बोलत नाही..!
बाहेर नुसती टपटप सुरु
अन् आत मनाची घालमेल,
भिजून बिलगतांना मला
आठवतच नाही तुझी वेल..!
आलास ये अन् गेलास जाss
पावसाs! इथे तुझं कुणी नाही,
पसारा करुन ओल्या थेंबांचा
ओंजळीत टिपणारा कुणी नाही..!
----------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment