प्रयत्न करतोय मराठी सुफी लिहिण्याचा बघू या कसे जमतेय..!
क्षण..!
ओले चिंब दिवस होते तें, पाऊस जेव्हा हवा-हवासा वाटलेला; आभाळही होता मेहरबान माझ्यावर, जेव्हा तुझ्या प्रेमात मी पडलेला.
आयुष्याच्या एका वळणावर
किनारा तुझा मला लागलेला,
उनाड त्या दिवसांत मग मी
असा नव्यानेच होतो जगलेला.
बाहेर पाऊस मस्त पडत होता,
झाडाखाली उभा राहून वाट
तुझी; आवडीने मी पाहात होता.
सावरत पदर तुही चालत होती,
काही नजरा चुकवून आली होती.
भिजलेल्या त्या दिवसांतली भेट
मिठीत तेव्हा जराशी उरली होती,
भर पावसात अन् ज्वानीत तुझ्या
माझीही तू नजरेने जिरवली होती.
पाऊस जातो आठवण ठेवून, पालवी एक नवी फुलवुन; जुनाच असलेला तो निसर्ग, आवडायला लगतो राहून राहून.
आजही पाऊस येईल
न तुझ्याशी भेट होईल,
थेंबाना थांबवून जाईल
तुला येतांना जेव्हा पाहिल
फार काही नाही उशीर
जरासा परतायला होईल,
स्वप्नात मग तुझी माझी
दररोज भेट तेव्हा होईल.
घेवुन सुगंध प्राजक्ताचा
आठवण तुझी मला येईल,
पहिल्याच प्रेमाचा ज्वर
भरभरुन उपोभोगून घेईल.
बाहेर पाऊस पडत राहातो, सारखी आठवण तुझी काढत राहातो; ओल्या चिंब दिवसातली तू, आठवत मी एकाकी झुरत राहातो.
.
समाप्त...
.
© मृदुंग
कसे वाटले कळवा जरुर..!
आयुष्याच्या एका वळणावर
किनारा तुझा मला लागलेला,
उनाड त्या दिवसांत मग मी
असा नव्यानेच होतो जगलेला.
बाहेर पाऊस मस्त पडत होता,
झाडाखाली उभा राहून वाट
तुझी; आवडीने मी पाहात होता.
सावरत पदर तुही चालत होती,
काही नजरा चुकवून आली होती.
भिजलेल्या त्या दिवसांतली भेट
मिठीत तेव्हा जराशी उरली होती,
भर पावसात अन् ज्वानीत तुझ्या
माझीही तू नजरेने जिरवली होती.
पाऊस जातो आठवण ठेवून, पालवी एक नवी फुलवुन; जुनाच असलेला तो निसर्ग, आवडायला लगतो राहून राहून.
आजही पाऊस येईल
न तुझ्याशी भेट होईल,
थेंबाना थांबवून जाईल
तुला येतांना जेव्हा पाहिल
फार काही नाही उशीर
जरासा परतायला होईल,
स्वप्नात मग तुझी माझी
दररोज भेट तेव्हा होईल.
घेवुन सुगंध प्राजक्ताचा
आठवण तुझी मला येईल,
पहिल्याच प्रेमाचा ज्वर
भरभरुन उपोभोगून घेईल.
बाहेर पाऊस पडत राहातो, सारखी आठवण तुझी काढत राहातो; ओल्या चिंब दिवसातली तू, आठवत मी एकाकी झुरत राहातो.
.
समाप्त...
.
© मृदुंग
कसे वाटले कळवा जरुर..!
No comments:
Post a Comment