छळ..!
कळ वेदनेची काळजात
थेंब आठवांचे डोळ्यात,
हिरमुसलेला चंद्र नभात
तरी हसतोय मी गालात,
भेट नाही आता उत्सवात
वाट नाही आता दिसण्यात,
चुकला पुन्हा ठोका क्षणात
काय अर्थ एकाकी वाहण्यात,
चाचपडत उठलो अंधारात
दिसेनासे झाले सर्वे उजेडात,
येऊन बसता जरा चांदण्यात
ही काय मजा आहे जगण्यात,
उघडत डोळे पापणी विव्हळत
असे मन माझे असते तळमळत,
उनाडत वारा येतोच खिंदळत
आठवत पानापानात सळसळत,
रडत मन पुन्हा कुशीशी झगडत
अडवत सारं उशीशी भांडत बसत,
तुझं-माझं नातं जेव्हा असं तुटतं
पोरकं होऊन मन एकाकीच पडतं
.
© मृदुंग
शुभ रात्री...!
No comments:
Post a Comment