होती एक प्रेयसी..!
माझ्या शब्दांना अर्थ देणारी
माझ्या शांततेला समजणारी,
कधी अबोल मला होवू न देणारी
कोमेजली कळी खुलवून आणनारी,
आजुबाजूच्या गर्दीत वैतागणारी
पावसा आधीच मला वर्दी देणारी,
जिथे जिथे पाऊल ठेवले घर म्हणनारी
स्वप्नांच्याच उंबरठ्यावर वाट पाहणारी,
कानोसा घेवून माझा लज्जेने चुर होणारी
तुटलेल्या गिटारीच्या तारांना सुर देणारी,
घायळ होवून शब्दांनी आसवं काढणारी
नको लिहूस असे काही सतत म्हणनारी,
पाना-पानालाही माझ्या जपून ठेवणारी
तुझं-ते-माझं आपलंच आहे बोलणारी,
होती एक प्रेयसी माझीही क्षण असणारी
होता हाही मृदुंग माझा-माझाच म्हणनारी.
होती एक प्रेयसी..! :-)
.
© मृदुंग
No comments:
Post a Comment