बघावे तिथे...
वासनेचा भुकेला
लालची लंपट
मोकळा पिसाट
लांडगा..
हपापलेला तो
आंबट शौकीन
दुश्मनचं स्त्री
चारीत्र्याचा...
जराशी जपून
तोलून मापून
मिळालेले आयुष्य
जगण्याचा...
नासवले नराधमाने
फसवले समाजाने
काय बर दोष होता
अबलेचा...
वाम मार्गावरी
चालली पावले
काय उपयोग या
शिक्षणाचा...
कर्ज श्वासांचे
व्याज आब्रूचे
असा का नियम
निसर्गाचा...
आवरा मोहाला
जपा चारीत्र्याला
ठरेल तो क्षण
सुखाचा...
---------- मृदुंग
No comments:
Post a Comment