Powered By Blogger

Friday, January 23, 2015

कार्टी..! ^_^

क्षण..!

कार्टी..! :-) <3

काही दिवसांपासून ती हिरमुसलेली आहे. मला वेळ नाही म्हणून चिडली आहे. उघडत नाही तिची पाकळी, कोवळी तक्रार आहे. थोडा थोडका असयाचा तिच्या वाटेला, हल्ली काहीच नाही आहे. काढायचो कसा बसा वेळ, असमाधानी ती तशीच, डबडबलेल्या डोळ्यांनी वाट पाहात उभीच. करतोय सोडवणूक आता स्वत:चीच, तिच्यासाठी वाटलं ते काय वाट्टेल ते. निरागस आहे ती अजुन, तरीही समजदार आहे. शाबूत राहावी तिची निरागसता सतत मी मागितलं आहे. वेळ आता जरा काढतो आहे, कार्टीला खुश करतो आहे. ओरडत आली ती काल न् आज उत्तर मी देत आहे. आढावा घेत आठवांचा, शेवटच्या श्वासांना लांबवत आहे. एक भातुकली पुन्हा रचत आहे. बाहुली माझी मला बोलवत आहे. खोड्या तिच्या आज आठवत आहे. टाहो फोडून रडणं तिच कानात गुणगुणत आहे. एक पैंजण रुणझुणत आहे. किलकिल्या डोळ्यांनी आसपास बघत आहे. हसू नतोस तू तोतळी बडबड करत आहे. पुन्हा काही क्षण जगायला ओढत आहे. सवड काढून मी ही कदाचित स्वार्थ साधत आहे. ओल्या आठवणींचा पसारा पुन्हा करत आहे. खुलून येईल तिची पाकळी, फुलपाखराला कोषात डांबून ठेवत आहे. बगडेल ती जेव्हा मागेमागे, उसने घेवून रंग फुलपाखराचे ते हळवे क्षण रंगवणार आहे.
.
© मृदुंग

No comments:

Post a Comment