म्हणे मला ती, म्हणे मी तिला..!
(म्हणे ती)
कितीदा सांगावं रे तुला मनाला
लागेल असे लिहित जावू नकोस
(म्हणे मी)
येव्हढीच प्रत्येक गोष्ट सांगतेस त्
श्वास घेवू नको बोलत का नाहीस
(म्हणे ती)
तुला तेव्हढेच हवे आहे रे, सतवून
आता उगा एकटा हसत बसणारेस
(म्हणे मी)
तू असल्यावर नसल्यावर एकांतात
केव्हढं माझ्यासाठी ठेवून जाणारेस
(म्हणे ती)
काही वाटतं का तुला असे बोलतांना
किती अजुन तू माझा छळ करणारेस
(म्हणे मी)
सुटका तुझी तर कधीच मी केली आहे
आता तूच माझी वाट अडवली आहेस
(म्हणे ती)
येव्हढी मी वाईट आहे का रे, जे सतत
उगाच मनात नसतांना तू बोलणारेस
(म्हणे मी)
अबोल मी आजही आहे, न बोलता तू
सारेच ऐकणार न अर्थ काढणार आहेस
.
© मृदुंग
No comments:
Post a Comment