Powered By Blogger

Friday, January 23, 2015

कान्हा रे कान्हा..! :-)

कान्हा रे... कान्हा रे...!

कान्हा रे कान्हा
छळू नकोस जा ना,
श्रावण तुझा पुन्हा
मला रे देवून जा ना

ओठांतली मुरली
अंतरी उतवून जा ना,
नक्षत्रांचा रास आज
पुन्हा रे देवून जा ना

चोरुन माखण माझे
मुखाने खावून जा ना,
यशोदेला रे तुझ्या
छळून आज जा ना

ना ती राधा, ना ती मीरा
संसार तुझा बघुन जा ना,
प्रेमाचा हा विश्व त्याग रे
विधाता तू येवून जा ना

कान्हाsssss कान्हाsss
साद तुझी ती देवून जा ना,
येsss नाsss येss नाsरे ... कान्हा...!
.
© मृदुंग

No comments:

Post a Comment