जरा मदत करा...!
पुरात सापडलेल्यांना अर्पण..!
देव दर्शनाला आलो आहे
पुरात पुरता अडकलो आहे
माझे सगेसोयरे सगळे काळजीत आहे
माझ्या सुखरुपतेची प्रार्थना करत आहे
माझा संपर्क अजुन कुणाशी झाला नाही
देवही त्याच्या घरात असुन भेटला नाही
आज उद्या निवळेल हेही उरी आशा आहे
कशाला देव-दर्शन सरकारची भाषा आहे
प्रत्येकाला माझी खुशाली कळवतो आहे
देवालाही लवकरच मी निरोप देतो आहे
काय सांगू अजुन सध्या मी बेपत्ता आहे
देव भेटीचा असा चुकला माझा पत्ता आहे
थोडीशीच मदत मी तुम्हाला मागतो आहे
निसर्ग संवर्धन करा हं आता सांगतो आहे
मी पुरात पुरता अडकलो आहे.....
मी पुरात पुरता अडकलो आहे.....
----------- मृदुंग
(कल्पनीक रचना रचली आहे चु.भू. द्या. घ्या)
No comments:
Post a Comment