Powered By Blogger

Monday, January 12, 2015

मराठी सुफी (प्रयत्न क्रमांक : तीन)

क्षण..!
मराठी सुफी (प्रयत्न क्रमांक : तीन)
लाटांच खळखळणं पानांच सळसळणं तसं तुझं माझ्यात दाटणं. मिठीत यायचे तू अन् पापण्यांना झुकवायचे. काय बोलावं मग तुझ्याशी शब्दांनी फितूर व्ह्यायचे. काय बघतोयेस असा लाजत तू विचारायचे. डोळ्यांनी वेचून सौंदर्य तुझे कवितेत मग मी मांडायचे. कातर होत जाणारी वेळ क्षणभर मी थांबवायची. विलग करता ओठं माझी काठं आपली भेटायची. धुंद ती सांज भली पाहाट मला वाटायची. वेचत एक एक शब्द माझी कविता तू जगायची..!
थरथरत्या ओठांवर नाव
तुझे आज आहे,
कित्येक युगांनी पाहिले
तुला आज आहे
सरु नकोस वेळ तू आता
श्वास धुंद आहे,
समोर उभा माझ्या माझा
आभास हा आहे
चांदणं लपेटून कांतीवर
श्रावण माझे बेईमान आहे,
यौवन ओघळत्या थेंबावर
सरे गं तुझे काय काम आहे
प्रितीत धुंद पखरं सांजेचे
पंखांवर रंग कुणा चित्रकाराचे,
हरपून भान तुला बघायचे
हळवे ते क्षण आपल्या प्रेमाचे
ती लगेच त्याच्या ओठांवर हात ठेवते. काही एक न बोलता फक्त डोळ्यात पाहाते. शब्दांसोबत स्पर्शाचे मौनही बोलू लागते. सांज सख्याला ती ही शब्दात गुंतवून जाते. नजरेपुढे बसवून त्याला ऐक मी काय सांगते..!
(ती)
मी तुझी लाट आहे ना
मी तुझी वाट आहे ना,
फुलासारख जपून मज
छळतोस का सांग ना
मिठीत तुझ्या मला
कायमचे आता घे ना,
आपल्यात हे अंतर
पापण्यात तू मिट ना
सांग सख्यारे मलाही
का तू असा दिवाणा,
कळते मलाही सारेच
तुझा बहाणा पुराना
जवळ येता तुझ्या का
अंतर वाढवतोस तू रे,
आहे या क्षणी मी तुझी
होवू दे ना मन हे बावरे
ती त्याला घट्ट मिठीत घेते. तो ही तिला कडकडून भेटतो. स्पर्श त्याच्या ओठांचा तिच्या भाळी होतो. रोमांचीत होवून तन दिर्घ श्वास उष्ण होतो. सैल होवून तिची मिठी तो गुलाबी चेहरा बघत राहातो. पापणी झुकताच तिची तो तिच्या हातात हात गुंफून घरट्याकडे चालू लागतो..!
तू माझी मी तुझा
अजुन काय हवे,
थेंबल दवांचे असे
आपलेच ना थवे
पाखरं होवून तू
उडून यायचे असे,
फुल - फुलपाखरु
तू ही बनायचे तसे
न मागता दिलेस
येव्हढेच पुरे आहे,
तुझ्यात तर माझे
हे जगच सारे आहे
उडत जावून दुर दुर
घरट आपलं एक आहे,
ना तू मजबूर तिथे आहे
ना कमजोर मी इथे आहे..!
एकच आभाळ असत. एक सारखच चांदणं असत. कुणासाठी कुणी तरी सर्व काही असत. अस्तित्वात नसलं तर स्वप्नात असत. डोळ्यात भरल्यावर मनात असत. श्वास बनत एक एक कुणाच कुणी कागदात असत. कधी चांदण्यात दिसत तर कधी चंद्रात दिसत. प्रत्येकाच कुणी तरी आभाळात असत..!
.
---------- समाप्त -----------
.
© मृदुंग
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment