सहज सुचलेले..!
(................) नाव तुम्हीच बहाल करा..!
शब्दांतून एखादे गीत मी लिहावे,
खुद्द निसर्गानेच मला संगीत द्यावे
वारा न् पाऊसही इथे श्रोते व्हावे,
सप्त सुरांचे सप्त रंगांशी नाते जुळावे
ओवाळूनी वेदनेला शल्य मी मागावे,
खट्याळ हासूनी सुखाने चालू लागावे
पुज्य वेदनेला मी आयुष्य अर्पण करावे,
मोबदल्यात मला जखमांचे दर्पण मिळावे
तुझ्या देणगीला मी स्वत: समर्पण व्हावे,
तुझीच इच्छा म्हणूनी मी होवून पूर्ण जावे
डोळ्यांनी शेवटी अंत मी पाहात असावे,
क्षणार्धात पुन्हा तुझे नवे अस्तित्व दिसावे
स्वागतास तुझ्या शब्दफुले सज्ज ठेवावे,
नाद तुझा 'मृदुंगा' नभी एकाकीच रे घुमावे.!
----------------------------- मृदुंग
शुभ रात्री...! :-)
No comments:
Post a Comment