|| जेव्हा तू आठवली ||
पाने सळसळली
वेदना तळमळली,
पावले घुटमळली
जेव्हा तू आठवली ||
सारे क्षण हरवली
ओंजळ रिती झाली,
सल मनात राहिली
जेव्हा तू आठवली ||
तुटतच स्वप्नं गेली
सजतच वाटं गेली,
क्षण निसटून गेली
जेव्हा तू आठवली ||
शब्द कागदावर रेंगाळली
लेखणीचे अश्रू ओघळली,
वेदनाही पुन्हा विव्हळली
जेव्हा मला तू आठवली ||
पावले माझी जड झालेली
पापण्यातही तुच उरलेली,
तरीही मी पुन्हा पाठ केली
जेव्हा मला तू आठवली ||
-------------------- क्षण
शुभ रात्री...! :-)
No comments:
Post a Comment